मुंबई

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची अखेर माघार; लुकआऊट नोटिशीला आव्हान देणारी याचिका घेतली मागे

फसवणूक प्रकरणात जारी केलेल्या लुकआऊट नोटिशीला स्थगिती मिळवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी अखेर मागे घेतली. अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मिस्टर बिस्ट यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर नियोजित बैठक रद्द झाली.

Swapnil S

मुंबई : फसवणूक प्रकरणात जारी केलेल्या लुकआऊट नोटिशीला स्थगिती मिळवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका गुरुवारी अखेर मागे घेतली. अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मिस्टर बिस्ट यांच्यासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर नियोजित बैठक रद्द झाली. त्या पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टीने याचिकाच मागे घेण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने शिल्पा शेट्टीची विनंती मान्य केली.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी जुहू पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध व्यापारी दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे.

राज कुंद्राच्या याचिकेवर लवकरच सुनावणी

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने लुकआऊट नोटीस रद्द करण्यासाठी विनंती केली आहे. त्याच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची विनंतीही ॲड. मुंदरगी यांनी केली. त्यानुसार खंडपीठाने आता हे प्रकरण १७ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीसाठी निश्चित केले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर