मुंबई

यंदा दसऱ्याला शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचीच तोफ धडाडणार!

बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे अतूट नातं आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या भाषणाची तोफ शिवाजी पार्क मैदानातून धडाडायची. मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशा दोन शिवसेना झाल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे अतूट नातं आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या भाषणाची तोफ शिवाजी पार्क मैदानातून धडाडायची. मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशा दोन शिवसेना झाल्या आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने मार्च महिन्यातच शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केल्याने यंदाच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा आवाज असणार आहे.

गेल्या ५६ वर्षांपासून दरवर्षी दसरा मेळाव्याला ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडून परवानगी देण्यात येते. मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील पक्ष संघर्षानंतर दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान कोणाला असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी पार्क मैदानाचा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. उच्च न्यायालयानेही उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदान देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान यंदा दसरा मेळाव्यासाठी फक्त ठाकरेंच्या शिवसेनेने अर्ज केला असून पहिला अर्ज ज्या पक्षाचा त्याला परवानगी या तत्त्वावर यंदा उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दसरा मेळाव्यासाठी फक्त ठाकरेंच्या शिवसेनेने अर्ज केला आहे.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल