मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी गीतांनी शिवप्रेमी मंत्रमुग्ध

उत्कृष्ट गीते सादर केल्याबद्दल संगीत व कला अकादमीचे राज्यपाल रमेश बैस यांनी कौतुक केले आणि पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करून संगीत पथकाचा गौरव केला.

Swapnil S

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘शिवजयंती उत्सव’ अंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सोमवारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी गीते सादर केली. उत्कृष्ट गीते सादर केल्याबद्दल संगीत व कला अकादमीचे राज्यपाल रमेश बैस यांनी कौतुक केले आणि पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करून संगीत पथकाचा गौरव केला.

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री दीपक केसरकर, पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटे, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, पालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गेट वे ऑफ इंडिया येथेही अभिवादन

भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पालिका प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटे, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) जयदीप मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाला फक्त चिन्ह देण्याचा अधिकार; उद्धव ठाकरेंची टीका

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार