मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा नारळ शिवसेना ठाकरे गट दसरा मेळाव्याच्या दिवशी फोडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्यासाठी गडबड होऊ नये, यासाठी शिवसेना उबाठा गटाने महापालिका कार्यालयाकडे जानेवारी महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला बुधवारी यश आले असून मुंबई महापालिका प्रशासनाने काही अटींसह दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर ठाकरेंना दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे २ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवाजी पार्क येथे ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे.