मुंबई

नाशिकात ठाकरेंना मोठा धक्का; संजय राऊतांचे निकटवर्तीय शिंदे गटात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अगदी जवळचे मानले जाणारे नाशिकमधील नेते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत.

प्रतिनिधी

शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्यापासून अनेक नेते, कार्यकर्त्ये हे ठाकरे गट सोडून शिंदे गट किंवा इतर पक्षामध्ये जात असल्याचे चित्र दिसत आहे. अशामध्ये आता संजय राऊत यांच्यामागे सावलीसारखे उभे राहणारे नाशिकमधील नेते भाऊ चौधरी हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे हा शिवसेना ठाकरे गटाला सगळ्यात मोठा फटका मानला जातो आहे.

भाऊ चौधरी हे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत होते. विशेष म्हणजे, संजय राऊत यांना जेव्हा तुरुंगवास झाला तेव्हा तुरुंगात जाताना आणि बाहेर येताना भाऊ चौधरीदेखील सोबत होते. त्यांची शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळताच पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भात संजय राऊत यांनीच ट्विट करत ही माहिती दिली. "शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे." असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, भाऊ चौधरी यांच्या प्रवेशाबाबत शिंदे गटाचे नेते सुहास कांदे म्हणाले की, "मैत्री वेगळी आणि राजकीय भविष्य वेगळे असते. त्यामुळे भाऊ चौधरींना वाटले असेल की ठाकरे गटापेक्षा शिंदेंसोबत भविष्य उज्ज्वल असेल. भाऊ चौधरींना काढून टाका असे उद्धव ठाकरेंनी सांगितले, असे ट्वीट मध्ये उल्लेख आहे. संजय राऊतांना विश्वासात घेतले असेल की नाही माहीत नाही. पण राजकीय भविष्य उज्ज्वल असेल, असे सांगितले असेल."

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक