मुंबई

BMC निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची फिल्डिंग; वॉर्ड निहाय मतदारांची मते जाणून घेणार

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदारसंघांत जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.

Swapnil S

मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदारसंघांत जोरदार फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. २६ ते २९ डिसेंबर या चार दिवसांत विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आदी नेत्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डात मतदारांचे मत काय?, मतदारांच्या अपेक्षा काय? याची माहिती घेण्यात येणार आहे. विभाग प्रमुख व शाखा प्रमुख हे वॉर्ड पिंजून काढणार आहेत.

२६ ते २९ डिसेंबर दरम्यान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्याला मते मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या चर्चेनंतर पक्षाची पुढील रणनिती आखली जाईल. विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या तयारीचा आढावा घेऊन जानेवारी महिन्यात ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.

ई-चलनच्या दंडाविरोधात न्यायालयीन लढाई; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

पेण अर्बनच्या खातेदारांना दिवाळी भेट; खातेदारांना ठेवींच्या १० टक्के रक्कम मिळणार, उच्च न्यायालयाचा निकाल

अक्कलकोटला दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; आजी-आजोबा आणि ८ वर्षांच्या नातवाचा मृत्यू, आई-वडील गंभीर

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा