मुंबई

धक्कादायक! मुंबईत ऑटोरिक्षात प्रियकराकडून प्रेयसीची गळा चिरुन हत्या

आरोपी प्रियकराचा त्याच्या प्रेयसीशी वाद झाल्याने त्याने रिक्षातच तिचा गळा चिरला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला

प्रतिनिधी

मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तीस वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने ऑटोरिक्षात हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर ही घटना घडली. आरोपी प्रियकराचा त्याच्या प्रेयसीशी वाद झाल्याने त्याने रिक्षातच तिचा गळा चिरला आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी या आरोपी प्रियकराला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

या धक्कादायक घटनेनंतर मुंबईसह राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलीकडेच मुंबईतील हर्बर लाईनला लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी साकीनाका येथील घटनेचा दाखला देत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "साकीनाक, मुंबई येथेत एका महिलेचा भर रस्त्यात गळा चिरुन खून करुन आरोपी पसार झाला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था ढासळी असून महिला सुरक्षित नाही. गुन्हेगार मोकटा असून नागरिक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यानी या संदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचं आहे." असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी गृहखात्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

BMC निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचितचं ठरलं! दोन्ही पक्षांची युती जाहीर, जागावाटपही निश्चित

Mumbai : १० कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठा खुलासा; २ महिलांना पोलीस कोठडी, मराठी अभिनेत्रीचाही सहभाग

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

'पटक पटक के मारुंगा…' एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टला जाणाऱ्या प्रवासी महिलेला ऑटोचालकाकडून धमकी; Video व्हायरल