x - @assetyogi
मुंबई

टोरेस घोटाळ्यात धक्कादायक खुलासा; युक्रेनियन आरोपीच्या वडिलांचे ३ वर्षे लालबागमध्ये वास्तव्य

कोट्यवधींच्या टोरेस घोटाळ्यात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आर्मेन याचे वडील, गरुन अताइन, १९७५ ते १९७८ दरम्यान लालबागच्या जाम बिल्डिंगमध्ये राहत होते. आर्मेनने हीच माहिती वापरून बनावट भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवले, अशी माहिती तपासादरम्यान भोईवाडा पोलिसांना समजली.

Swapnil S

पूनम आपराज / मुंबई

कोट्यवधींच्या टोरेस घोटाळ्यात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आर्मेन याचे वडील, गरुन अताइन, १९७५ ते १९७८ दरम्यान लालबागच्या जाम बिल्डिंगमध्ये राहत होते. आर्मेनने हीच माहिती वापरून बनावट भारतीय जन्म प्रमाणपत्र मिळवले, अशी माहिती तपासादरम्यान भोईवाडा पोलिसांना समजली.

भोईवाडा पोलिसांनी युक्रेनियन आरोपी आर्मेन अताइन (४८) याच्या विरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ-दक्षिण विभागातून बनावट जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररीत्या मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आर्मेनसह, त्याला बनावट दस्तऐवज मिळवण्यात मदत करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींवरही IPC कलम १२०बी, ३४, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ४७४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टोरेस घोटाळ्याचा पर्दाफाश जानेवारीमध्ये झाला होता, आणि सध्या त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, आर्मेनलाही काही दिवसांपूर्वी मालाडच्या मढ रोडवरून अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणाच्या तपासासाठी लवकरच त्याला भोईवाडा पोलिसांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार, आर्मेनने भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी पालिकेच्या एफ-दक्षिण विभागातून बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवले. हा विभाग भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, आर्थिक गुन्हे शाखेने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. चौकशीनंतर, भोईवाडा पोलिसांनी काल उशिरा एफआयआर दाखल केला.

बॉलिवूडमध्ये लहान भूमिका केलेल्या आर्मेनकडे युक्रेनियन पासपोर्ट आहे. मात्र, त्याने १९७६ मध्ये मुंबईत जन्म झाल्याचे दाखवणारा बनावट जन्मदाखला वापरून भारतीय पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तपासात आणखी काय उघड झाले?

आर्मेनने बनावट जन्म प्रमाणपत्रावरील पत्त्याचा वापर भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी केला. भोईवाडा पोलिसांनी लालबाग येथील जाम बिल्डिंग नं. २, रूम नं. २२ येथे जाऊन सोसायटीचे अध्यक्ष महेश हेन्द्रा आणि अन्य सदस्यांशी चर्चा केली. त्यांनी पुष्टी दिली की, गरुन अताइन आणि त्याचे कुटुंब १९७५ ते १९७८ पर्यंत तिथे राहत होते, त्यानंतर ते तिथून निघून गेले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत