मुंबई

मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ; आता ४ हजार २०० मेगावाॅट विजेचे वहन करणे शक्य

५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत काम पूर्ण झाले. यामुळे दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावाॅटऐवजी ४ हजार २०० मेगावाॅट विजेचे वहन शक्य होईल.

Swapnil S

मुंबई : मुंबई शहर व उपनगराच्या वीज मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषणच्या ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर बसविण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून (महापारेषण) १७ दिवसांत पूर्ण केले आहे.

५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत काम पूर्ण झाले. यामुळे दोन्ही वाहिन्या मिळून २००० मेगावाॅटऐवजी ४ हजार २०० मेगावाॅट विजेचे वहन शक्य होईल.

महापारेषणच्या ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र.१ या वाहिनीचे यापूर्वीच २७ कि.मी.चे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित २३ कि.मी.चे काम महापारेषणने युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. वाहिनीच्या कामात रेल्वे, हायवे व उच्च विद्युत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन तसेच ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यासारखी मोठी आव्हाने होती. या अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतिशीलता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून २३ कि.मी.चे वरील काम तातडीने पूर्ण केले. या कामामुळे ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-१ च्या क्षमतेत आमूलाग्र बदल होऊन पूर्वीच्या १००० मेगावाॅटऐवजी २१०० मेगावाॅट पर्यंत विजेचे वहन करणे शक्य होणार आहे.

आर्थिक मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे 'हंगामी' ठेवता येणार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Virar News : अश्लील फोटो, ब्लॅकमेल अन् वडिलांचा अपमान; विवा कॉलेजमधील १९ वर्षांच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन

पेट्रोलियम पदार्थांच्या भेसळीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम; HC ने व्यक्त केली चिंता

रमाबाई आंबेडकर नगरवासीयांचे स्वप्न २ वर्षांत होणार पूर्ण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

वाळू घाटांचे लिलाव पंधरा दिवसांत! दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करणार : बावनकुळे