मुंबई

राज्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पाऊस पडणार कमी; स्कायमेटने व्यक्त केला अंदाज

स्कायमेटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबरमध्ये देशभरात सरासरीच्या ९४ टक्केच पाऊस पडणार असे सांगण्यात आले

प्रतिनिधी

गेले काही महिने राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. स्कायमेटने अंदाज व्यक्त केला आहे की, यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. यंदा जून ते सप्टेंबर यामध्ये ९४ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला. तसेच, राज्यातही कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार, भारतात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत ८५८.६ मिमी सरासरी पाऊस राहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य भारतात पावसाची तूट पाहायला मिळणार आहे. तसेच, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा प्राथमिक अंदाज असून त्यानंतर पुन्हा एकदा एक अंदाज वर्तवण्यात येणार आहे.

देशभरातील सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवा; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

Thane : पालिका निवडणुकीची सूत्रे आमदार संजय केळकरांकडे; ठाण्यात शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव वाढणार

बांगलादेशात कांद्याचे भाव शंभरी पार; भारतीय निर्यातदारांकडून आयातबंदी उठवण्याची मागणी

वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ! तिसऱ्या फेरीनंतरही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ३८७ जागा रिक्त