ANI
मुंबई

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना न्यायालयाचा झटका; सत्र न्यायालयाने ठोठावला तीन हजारांचा दंड

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने चांगलाच झटका दिला.

Swapnil S

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विशेष सत्र न्यायालयाने चांगलाच झटका दिला. कोरोना काळात वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीला नार्वेकरांनी दांडी मारल्याने विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ३ हजार रुपयांचा दंड ठोठावत चांगलाच झटका दिला.

भाजपच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. भाजपने २०२०मध्ये कोरोना लॉकडॉऊनच्या काळात बेस्टच्या वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना कार्यालयात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपच्या एकूण २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याचे काम सुरू आहे. सुनावणीला राहुल नार्वेकर हे गैरहजर होते. गेल्या तीन वर्षांपासून खटला सुरू असून, उच्च न्यायालयाने जलदगती सुनावणीचे निर्देश दिले असतानाही नार्वेकर यांनी गैरहजेरी लावल्यामुळे न्यायालयाने नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ८ जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे सक्त निर्देश दिले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री