मुंबई

उद्धव ठाकरेंना सोनियांचा पाठिंबा

प्रतिनिधी

बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता ठाकरे गट पहिल्यांदाच मोठ्या निवडणुकीला सामोरा जात आहे. अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील दोन्ही पक्षांनी पाठिंबा दिला असून, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी याविषयीची माहिती दिली.

काँग्रेस नेतृत्वाने अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चासुद्धा झाली. महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंना पाठिंबा द्यायचा, असा निर्णय सोनिया गांधींनी घेतला आहे. सोनिया गांधींनी ठाकरेंना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. काँग्रेसने या निवडणुकीसाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी उद्धव यांनी सोनिया गांधींचे आभार मानले,” असे थोरात यांनी सांगितले. तसेच या पोटनिवडणुकीला आम्ही एकत्र सामोरे जाणार आहोत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींवरून थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजपने ज्या पद्धतीने राज्यातील सत्ता ताब्यात घेतली आहे, त्यामुळे जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. या नाराजीचा परिणाम या निवडणुकीमधून समोर येईल.”

शिवसेनेची कसोटी

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेनेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

दबाव आणल्यास भारत सोडू; WhatsApp चा दिल्ली हायकोर्टात इशारा

कांदा करतोय गुजरातचा धंदा, तर महाराष्ट्राचा वांदा!

व्हीव्हीपीएटी व ईव्हीएम पडताळणीस नकार; मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणीही SC ने फेटाळली; पण दिले 'हे' दोन निर्देश

ठाण्यात ईव्हीएम व हजारो मतदार कार्डे सापडल्याने खळबळ