मुंबई

स्पाईसजेटच्या विमानाचे चाक निखळले; मुंबईत सुरक्षित लँडिंग

चाक निखळलेल्या स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वीरीत्या लँडिंग करण्यात आले. ७५ प्रवासी असलेल्या स्पाइसजेटच्या ‘क्यू ४००’ या विमानाने गुजरातच्या कांडला विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र, त्याचे एक चाक तेथील विमानतळावर निखळले.

Swapnil S

मुंबई : चाक निखळलेल्या स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वीरीत्या लँडिंग करण्यात आले. ७५ प्रवासी असलेल्या स्पाइसजेटच्या ‘क्यू ४००’ या विमानाने गुजरातच्या कांडला विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र, त्याचे एक चाक तेथील विमानतळावर निखळले. यानंतरही मुंबई विमानतळावर विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग करण्यात यश आले आहे.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी कांडला ते मुंबई प्रवास करणाऱ्या ‘क्यू ४००’ या विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानाच्या बाहेरच्या बाजूचे चाक धावपट्टीवर आढळले. विमानाने मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग केले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान, स्पाइसजेटच्या विमानाच्या आपत्कालीन लँडिगसाठी मुंबई विमानतळावर इतर विमानांचे उड्डाण काही वेळेसाठी थांबवण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात FDA ची मोठी कारवाई; चार ट्रक पनीर-खवा जप्त

म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दसऱ्याला; लॉटरीत एक हजार घरांचा समावेश

Mumbai : ‘कारवाई करा, अन्यथा सत्तेतून बाहेर पडू’; अमेय घोले यांचा भाजपला अप्रत्यक्ष इशारा

Mumbai : वर्सोवा भूखंडावरून काँग्रेस-शिवसेना आक्रमक; अग्निशमन केंद्राचे आरक्षण हटविण्यास विरोध, सुधार समितीत काँग्रेसची मागणी

जमीन संपादन कायदा हा स्वयंपूर्ण; दिवाणी न्यायालयाचा अधिकार नाही - हायकोर्ट