मुंबई

राजावाडी रुग्णालयात कामबंद आंदोलन; कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा निषेध

महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण तसेच सातत्याने असे प्रकार घडत असल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

Swapnil S

मुंबई : महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण तसेच सातत्याने असे प्रकार घडत असल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.

म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सहाय्यक सरचिटणीस शैलेंद्र खानविलकर व सहचिटणीस सूर्यकांत गुढेकर यांनी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मारहाण व धमकीबाबत रुग्णाच्या नातेवाईकांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी कामगारांनी कामबंद आंदोलन केले.

५ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता एका रुग्णाला त्याच्या नातेवाईकांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यावर नातेवाईकांनी तेथील एकमेव शॉक द्यायची मशीन तोडली आणि लॅरेंजर स्कोप फोडण्यात आला. तसेच टेबलवर असणारे पिनबॉक्स डॉक्टरांच्या दिशेने फेकून मारले. तेथील डॉक्टर व सफाई कामगार यांना शिवीगाळ करीत धमकावले, असा आरोप आहे. सफाई कामगार नितेश सादरे यांना मारहाणही करण्यात आली. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्याची मागणी

या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व कामगार यांची सभा घेण्यात आली. पालिका रुग्णालयांत पुरेसे सुरक्षारक्षक नसल्यामुळे त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी युनियनने केली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी