मुंबई

बोरिवली स्थानकावर टीसीला प्रवासी तरुणी आणि गुंडांकडरुन मारहाण; पोलिसांनी सांगितलं कारवाई न करण्याचं कारण

नवशक्ती Web Desk

मुंबईत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एनसीएम इंडिया कौन्सिल फॉर मेन अपेयर्स प्रत्येकासाठी समान-हक्क-समूह यांनी रविवारी यासंदर्भात रविवारी एक्स या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली. पश्चिम रेल्वेत टीसी म्हणून कार्यकरत असलेल्या आणि सध्या मुंबईच्या बोरीवली स्टेशनवर तैनात असलेल्या राहुल शर्मा यांनी विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका मुलीली हटकलं. यावेळी या मुलीकडून आणि तिच्यासोबत असलेल्या गुंडांकडून राहुल यांच्याशी गैरवर्तन करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संबंधित तरुणीने गुंडांच्या मदतीने टीसीला मारहाण करुन देखील घटनास्थळी असलेल्या जीआरपीला तरुणीवर कोणतीही कारवाई करता आली नाही. रेल्वे जर आपल्याचं अधिकाऱ्यांचं संरक्षण करु शकणार नसेल, तर इतर प्रवाशांचं संरक्षण कसं करेल? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फ्री प्रेस जरर्नलने बोरिवली रेल्वे स्थानकाच्या संपर्क साधला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अनिल कदम यांनी अशा घटनेची पुष्टी केली. परंतु कोणत्याही पक्षाकडून औपचारिक तक्रार दाखल केला नसल्याचं सांगितलं. तक्रार नोंदवली नाही तर माहिती देण्याच्या आधारावर पोलिसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसंच सुत्रांच्या माहितीनुसार टीसी आणि एका मुलीने कथितरित्या एकमेकांवर हल्ला केला असून शेवटी तडजोड झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस