मुंबई

Palghar : पालघरमधील धक्कादायक घटना समोर; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पालघरमध्ये (Palghar) एका १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून नराधमांवर पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल

प्रतिनिधी

पालघरमधून (Palghar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना पालघरमधील माहीम येथे घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सातपाटी पोलिसांनी याप्रकरणात ८ नराधमांना अटक केली आहे. हे कृत्य करणारा पीडित मुलीचा मित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या या ८ जणांवर पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीला तिचा मित्रच माहीम परिसरातील एका निर्जनस्थळी घेऊन गेला. त्यानंतर ८ जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलीने माहीम पोलिसांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. यांनतर ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली की, शनिवारी १७ डिसेंबरला माहीम पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या वडिलांनी अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्रीपासून घरी आली नसल्याची तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी तिच्या फोनच्या साहाय्याने शोध घेतला. तिने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या काळामध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

अनियंत्रित विकास मानवी मुळावर

या स्थलांतरितांचे करायचे काय?

आजचे राशिभविष्य, २६ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार