ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राष्ट्रवादी एकाकी; जयंत पाटील दोन तास 'मातोश्री'वर  
मुंबई

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राष्ट्रवादी एकाकी; जयंत पाटील दोन तास 'मातोश्री'वर

जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली. मात्र, या भेटीत ठोस निर्णय झाला नसून राज व उद्धव यांच्या एकत्र येण्याने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत एकाकी पडल्याची चर्चा आहे.

Swapnil S

मुंबई : विक्रोळी, भांडुप प्रभागात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या ठिकाणी राष्ट्रवादीला जागा मिळावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडला. मात्र, मनसे व शिवसेनेची युती झाली असून त्याठिकाणी मनसे व शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि.२६) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली. मात्र, या भेटीत ठोस निर्णय झाला नसून राज व उद्धव यांच्या एकत्र येण्याने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत एकाकी पडल्याची चर्चा आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली असून त्यांचे जागावाटपही जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांची यादीही तयार असून शनिवारी मनसेकडून उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नव्या समीकरणांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची खूपच अडचण झाल्याचे दिसून येत आहे. आधीपासून मुंबईत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होते. मात्र, राज ठाकरेंच्या एन्ट्रीमुळे ‘मविआ’तून काँग्रेस बाहेर पडली आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस स्वबळावर लढत आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे नेमकी कोणाशी युती करायची असा पेच राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे उभा आहे.

विक्रोळी, भांडुपच्या जागेवरून तिढा

ठाकरे गट राष्ट्रवादीला काही जागा सोडण्यास तयार आहे. मात्र, राष्ट्रवादीचा डोळा विक्रोळी आणि भांडुप या महत्त्वाच्या मतदारसंघांवर आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या युतीमुळे या जागांवर मनसे किंवा शिवसेना निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागा राष्ट्रवादीला सोडायच्या कशा, असा मोठा प्रश्न ठाकरे गटासमोर उभा ठाकला आहे. या दोन जागांवरून दोन्ही पक्षांत पेच निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यातच शनिवार आणि रविवार या सुट्ट्या आल्याने उमेदवारांकडे आणि पक्षांकडे केवळ हाताशी दोन-तीन दिवस उरले आहेत. या मर्यादित वेळेत जागावाटपाचा हा गुंता कसा सुटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठाकरे गटासोबत आघाडीसाठी आम्ही प्रयत्नशील - जयंत पाटील

‘उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली, मात्र अजून ही चर्चा निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाही. महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी कॉंग्रेस एक घटकपक्ष असल्याने शिवसेनेसोबत आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी एकत्र यावी असा आमचा प्रयत्न होता. काँग्रेस आणि शिवसेना मोठे पक्ष आहेत, मुंबईत त्यांच्याएवढी आमची ताकद नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतोय. काही सिटींग नगरसेवक मागील वेळेस निवडून आले त्या जागा आम्हाला सोडाव्यात असा आमचा प्रयत्न असून चर्चा सुरू आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगली भडकवण्याचा आरोप असलेल्या आरोपीला शिवसेनाप्रमुखांच्या सुपुत्राने आपल्या पक्षात प्रवेश देणे, म्हणजे त्यांच्या कडवट हिंदुत्वाचा अपमान आहे. हा निर्णय केवळ मतांचे लांगूलचालन करण्यासाठी आहे. अशा प्रकारे व्यक्तीविशेषांना पक्षात सामावून घेणे म्हणजे विचारधारेचा त्याग असून, यातून संबंधित नेतृत्वाची वैचारिक घसरण स्पष्टपणे दिसून येते. विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आणि त्यातून मते मिळवायची, हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसा नाही. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दाखवली जात आहे. मात्र, अशा राजकारणाला जनता भुलणार नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार खपवून घेणार नाही. बांगलादेशातील हिंदूंच्या पाठीशी संपूर्ण भारत देश उभा असून तेथील हिंदूंना सुरक्षित ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लिबर्टी शोरूमने तुटलेल्या चप्पलीची वॉरंटी नाकारली; वाद थेट कोर्टात, मॅनेजरला होणार अटक

Google Update : जुना ईमेल आयडी बदलायचाय? आता गुगल देणार नवा पर्याय; जाणून घ्या नियम

रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल

'तो स्पष्ट नाराज दिसतोय!'; एपी ढिल्लोंने ताराला Kiss केल्यानंतर वीर पहारियाची प्रतिक्रिया व्हायरल | Video

Mumbai : ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट