मुंबई

ठाणे, कोपर रेल्वे स्थानक बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; प्रस्ताव राबविण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एमएसआरडीसी कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेलने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते.

बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.

Mumbai : बेस्ट वसाहतीला BMC ची नोटीस; श्वानांना अन्न देण्यावरून घर रिकामे करण्याची धमकी देणे आले अंगाशी

जिमखाना क्लब कारवाईचे केंद्र सरकारकडून समर्थन

अभिषेक बॅनर्जींना नोटीस; तृणमूल आमदारांच्या तक्रारीवरून सरकारची कारवाई

राज्यात ९८ टक्के पाऊस पडणार! ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज

अपात्र बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, १४ हजार पुरुषांकडून पैसे वसूल करणार