मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात 
मुंबई

मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरीवली-ठाणे प्रवास फक्त १५ मिनिटांत, बोगद्याच्या कामाला सुरुवात

सध्या ठाणे ते बोरीवली दरम्यानचा सुमारे २३ किमीचा प्रवास घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे ६० ते ९० मिनिटांचा होतो.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवणाऱ्या ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बोगदा खोदकामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी

सध्या ठाणे ते बोरीवली दरम्यानचा सुमारे २३ किमीचा प्रवास घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे ६० ते ९० मिनिटांचा होतो. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

प्रकल्पाची महत्त्वाची माहिती

  • प्रकल्पाची सुरुवात : १९ मे २०२३

  • अपेक्षित पूर्णता : मे २०२८

  • एकूण लांबी : ११.८४ किमी

  • त्यापैकी १०.२५ किमी ट्विन टनेल

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली बोगदा

हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार असून पर्यावरणीय परिणाम कमी ठेवण्यासाठी अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन (TBM) चा वापर केला जात आहे. या प्रकल्पात 'नायक' ही भारतातील सर्वात मोठी हार्ड रॉक TBM कार्यरत असून 'अर्जुन' ही दुसरी मशीन लवकरच सुरू होणार आहे.

सुरक्षिततेवर विशेष भर

प्रत्येक बोगद्यात ३ लेन (आपत्कालीन लेनसह) असणार आहेत. दर ३०० मीटरवर क्रॉस पॅसेज, आधुनिक व्हेंटिलेशन प्रणाली, अग्निशमन यंत्रणा, स्मोक डिटेक्टर्स आणि LED माहिती प्रणाली यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील.

मुंबईसाठी दीर्घकालीन फायदे

या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच वायू व ध्वनी प्रदूषणात घट होऊन शहरातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. ठाणे-बोरीवली ट्विन टनेल हा केवळ रस्ता प्रकल्प नसून, आगामी काळात मुंबईच्या पायाभूत सुविधांना बळ देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन