PM
मुंबई

तळीरामांसाठी गुड न्यूड! नाताळ, नववर्षाला दारुची दुकानं आणि बार 'इतक्या' वाजेपर्यंत सुरु राहणार

नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मद्यप्रेमींना खूश करणारा महत्त्वाचा निर्णय....

Swapnil S

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकाने, बार पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य गृह विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करता येणार आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २४, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी मद्य विक्रीची दुकाने, परमिट रुम पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याशिवाय, काही ठिकाणी वाईन शॉप, परदेशी आणि उंची मद्य विक्री करणारी दुकाने ही रात्री १ वाजेपर्यंत खुली असणार आहेत. त्याशिवाय, पब, बार अॅण्ड रेस्टोरंट्स, बीअर बारदेखील पहाटे पाच वाजेपर्यंत खुली असणार आहेत.

मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो. मद्य विक्रीमुळे राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे या वेळ वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक फायदा होणार आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून जिल्हाधिकारी या वेळेच्या शिथिलतेबाबत निर्णय घेऊ शकतात. याचाच अर्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वेळेबाबत दिलेली सूट रद्द होऊ शकते.

आता विधानभवनात मंत्री, अधिकाऱ्यांनाच प्रवेश; विधिमंडळात मंत्र्यांना बैठका घेण्यास मनाई, हाणामारीमुळे अभ्यागतांना ‘नो एंट्री’

Ahmedabad Plane Crash : ''माफी मागा, नाहीतर..'' पायलट असोसिएशनची WSJ आणि Reuters ला कायदेशीर नोटीस

विठ्ठलाच्या दर्शनाची आस राहिली अधुरी; चंद्रभागेत तीन महिला भाविक बुडाल्या, दोघींचा मृत्यू, एक बेपत्ता

तृणमूल सरकार गेल्यानंतरच बंगालचा विकास होईल; पंतप्रधानांची गर्जना

आमदार माजलेत, ही जनभावना! मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना कानपिचक्या