मुंबई

उपवन तलावाचे सौंदर्य उजळले; ठाण्यातील संगीतमय कारंजे, घाटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य अशा उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.

Swapnil S

ठाणे : ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य अशा उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने दिलेल्या निधीतून, ठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे 'वॉटर स्क्रीन'सह आहेत. त्यावर, दाखविण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत. त्यांचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिर असे या शोंचे विषय आहेत. हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर केले.

ठाणे शहर आता बदलू लागले आहे. स्वच्छ होत आहे, रस्ते चांगले होत आहेत. महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम उत्तम सुरू आहे. आपल्याला ठाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. उपवन तलाव परिसरात ठाणेकर आतापर्यंत फक्त चालायला, फिरायला यायचे आता त्यांना या संगीतमय कारंजाचाही आनंद घेता येईल. नागपूरला फुटाळा तलावातील कारंजे पाहिल्यावर आमदार प्रताप सरनाईक यांना असे कारंजे ठाण्यात करण्याबद्दल बोललो होतो. त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरात कारंजे सुरू करूनही दाखवले, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच, येथील शो विनामूल्य ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा तसेच, संदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, जयश्री डेव्हिड, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभापूर्वी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.

मुख्यमंत्र्यांनी ठाण्याला भरभ‌रून दिले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघाला, ठाण्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. अशी आणखी दोन संगीतमय कारंजी लवकरच सुरू होतील. अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिली. याच कार्यक्रमात, चित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे, त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिली. -प्रताप सरनाईक, आमदार

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी