मुंबई

मीलन सबवे पूरमुक्तीचा खर्च महागला!

मिलन सबवे पूरमुक्तीचा खर्च ५९ कोटी ३८ लाख ७३ हजारांवर पोहोचला आहे

नवशक्ती Web Desk

पावसाच्या हलक्या सरी बरसल्यानंतर मिलन सबवेत पाणी साचल्याने तो बंद करण्यात येतो. मिलन सबवे पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने भूमिगत टाकी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपासून पूरमुक्तीचे काम हाती घेतले असून या कामाच्या खर्चात वाढ होत आहे. या कामांसाठीच्या वाढीव कामासह एकूण २३ कोटी ३८ लाख ७३ हजार ८२३ रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, याआधी ३६ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आता पुन्हा २३ कोटी ३८ लाख ७३ हजारांनी वाढ झाल्याने मिलन सबवे पूरमुक्तीचा खर्च ५९ कोटी ३८ लाख ७३ हजारांवर पोहोचला आहे.

निष्क्रिय इच्छामरणासाठी खासगी रुग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापणार

Mumbai : आरोग्य समिती अध्यक्षांची झाडाझडती; केईएममध्ये रात्री दिली भेट

NEET मध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; श्रावणी कुदळे देशात पाचवी

मतदार म्हणून वगळले तरी नागरिकत्व कायम - सर्वोच्च न्यायालय

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना हटवण्याच्या विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लांबणीवर