मुंबई

समुद्रात बुडालेल्या त्या मुलीचा मृत्यू

नवशक्ती Web Desk

मुंबई : वांद्रे बँडस्टँड येथे समुद्रात बुडालेल्या २७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. कोस्ट गार्डने राबवलेल्या शोध मोहिमेनंतर २० तासानंतर मुलीचा शोध लागला असून तिचे शव मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

रविवारी सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेली ज्योती सोनार (२७) हिचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने रविवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वांद्रे किल्ला बँडस्टँड येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. मुंबई अग्निशमन दलाचे जवान, लाईफ गार्ड यांनी रविवार संध्याकाळपासून मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र पाऊस व रात्र झाल्याने येणारे अडथळे पाहता शोध मोहीम थांबवण्यात आली होती. कोस्ट गार्डच्या मदतीने पुन्हा एकदा सोमवारी सकाळपासून बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दुपारी १ वाजताच्या सुमारास ज्योती सोनार या मुलीचा शोध घेण्यात कोस्ट गार्डला यश आले. तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले असता, तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त