मुंबई

यंदा केलेले निवडणुकीचे काम कायम स्मरणात राहील; दोन मतदान अधिकाऱ्यांचे आपल्या निर्वाचन अधिकाऱ्याबाबत पत्र

निवडणुकीचे काम म्हणजे मतदान अधिकाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याचा समज आजवर प्रस्थापित आहे. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध जबाबदारी पार पाडलेल्या दोन निवडणूक अधिकाऱ्यांनी हा समज खोडून काढला आहे. मुंबादेवी मतदारसंघातील निर्वाचन अधिकाऱ्यांचे कौतुक करत २०२४ ला केलेले निवडणुकीचे काम कायम स्मरणात राहील, असा अनुभव या दोन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

मुंबई : निवडणुकीचे काम म्हणजे मतदान अधिकाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास असल्याचा समज आजवर प्रस्थापित आहे. मात्र नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विविध जबाबदारी पार पाडलेल्या दोन निवडणूक अधिकाऱ्यांनी हा समज खोडून काढला आहे. मुंबादेवी मतदारसंघातील निर्वाचन अधिकाऱ्यांचे कौतुक करत २०२४ ला केलेले निवडणुकीचे काम कायम स्मरणात राहील, असा अनुभव या दोन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आपल्या निर्वाचन अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक करणारे पत्र या दोन अधिकाऱ्यांनी लिहिले आहे.

रश्मी ली जॉर्ज या सेंट झेवियर्स महाविद्यालयाशी संलग्न आहेत. राजी बाबू हे एलआयसीमध्ये काम करतात. या दोन अधिकाऱ्यांनी बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघात काम केले. यावेळी एसआरएचे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील हे मुंबादेवी मतदारसंघात निर्वाचन अधिकारी म्हणून कार्यरत होते.

मुंबादेवी मतदारसंघात शांततापूर्ण मतदान होण्यासाठी निर्वाचन अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची रश्मी ली जॉर्ज आणि राजी बाबू या दोघांनी स्तुती केली. तसेच पहिल्यांदाच निवडणुकीचे काम करून आनंदाने बाहेर पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या निवडणुकीतील अनुभव त्यांच्यासाठी वेगळा होता. निर्वाचन अधिकारी असलेले पाटील यांच्या सूचना, नियोजन, दृष्टिकोन याचे या दोघांनीही कौतुक केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. यावेळी ६.३ करोड मतदारांनी मतदान केले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश