Hp
मुंबई

'या' नंतर होणारं आंदोलन सरकारला पेलवणारं नाही आणि परवडणारही नाही ; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

नवशक्ती Web Desk

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरकक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीअनेक आंदोलन केली उपोषण देखील केलं. पण अजूनही सरकारनं ठाम असा निर्णय घेतला नाही. जरांगे पाटील यांनी सरकारला एक 40 दिवसांचा वेळ दिला आहे त्यानुसार आता येणाऱ्या 24 तारखेपर्यंत सरकारकडे वेळ आहे. त्यानंतरचं आंदोलन होईल ते सरकारला झेपणारही नाही आणि पेलणारही नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसंच, मराठा समाजाला आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाचं म्हणून समजा', असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते शनिवारी कर्जत येथे सकल मराठा समाज आयोजित महासभेत बोलले होते.

आरक्षण मिळवण्यासाठी आपली फक्त एकजूट वाढवा आता आरक्षण घेतल्याशिवाय कोणीही माघार घ्यायची नाही, मी माघार अजिबात घेणार नाही, तुम्ही पण मागे हटायच नाही. पण आपल्याला हे आरक्षण शांतता पाळून घ्यायच आहे, त्यासाठी कोणी आपला जीव देऊ नका, आपल कुटुंब उघड्यावर टाकू नका, असं देखील यावेळी मनोज जरांगे यांनी समाज बांधवांना सांगितलं. मराठा समाजास आरक्षण देताना कोणी आडवा आला तर त्याला टप्प्यात घेतलाच म्हणून समजा, याच जातीने अनेक राजकीय नेत्यांना मोठं केलं, मात्र आता आज तेच नेते आमच्या विरोधात उभे राहिले आहेत, अशी खंत मनोज जरांगे यांनी यावेळी बोलून दाखवली.

जरांगे पाटील जेव्हा सभेसाठी आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भव्य हार क्रेनच्या साह्यानं कर्जतच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात उभारला होता. याशिवाय सात जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यासाठी युवक उभे होते मात्र जरांगे पाटील यांनी फुले न टाकण्याची विनंती केली. त्यांनी साधेपणानं सभास्थळी जाण पसंत केलं. त्याचबरोबर अशा पद्धतीन स्वागत करू नका, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा सगळा पैसा जपून ठेवा, असं आवाहन देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केलं.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस