मुंबई

जीएसटी करार जुलै अखेरीस संपुष्टात येणार,मुंबई महापालिका चिंतेत

जकात बंद केल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

प्रतिनिधी

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत जकात बंद झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य कर ( जीएसटी) देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ५ वर्षांसाठी झालेला करार जुलै अखेरीस संपुष्टात येत असल्याने मुंबई महापालिकेला राज्य सरकारकडून जीएसटीचे पैसे मिळणार का, अशी चिंता मुंबई महापालिकेला सतावत आहे.

मुंबई महापालिकेचे मुख्य स्रोत जकात होते. मात्र जकात बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जकात बंद केल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील महानगर पालिका, नगर पालिकांना जीएसटीचे पैसे देण्याचा करार ५ वर्षांसाठी केला आहे. जुलै अखेरीस हा करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला पैसे दिले नाही, तर राज्य सरकार मुंबई महापालिकेला पैसे कसे देणार, अशी चिंता मुंबई महापालिकेला सतावत असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

घरात चिखल, शेतात पाणीच पाणी! दुष्काळासाठी ओळखणारा मराठवाडा अतिवृष्टीने हैराण; बळीराजाच्या डोळ्यात अश्रू

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : आरोग्य उपचारांसाठी मोठा दिलासा, तर रेल्वे आणि गृहनिर्माण क्षेत्राला चालना

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव