मुंबई

परिवहन विभागाच्या बसेसची संख्या पोहोचली ७२ हजारच्या वर

एकेकाळी २५ हजारावर असणारी प्रवाशी संख्या आताही २१ जून रोजी मंगळवारी ७२ हजार ५२१ पर्यंत गेली आहे

प्रतिनिधी

भाईंदर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेसमधून प्रवाशी संख्या ७२ हजारच्या वर पोहोचली आहे. पालिकेच्या एकूण ७४ बसेस पैकी ७० बस चालू आहेत म्हणजेच ९५ टक्के बस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. शहरात दररोज एकूण रोजच्या - रोज ७९९ फेऱ्या आहेत त्यापैकी ७९२ ते ७९८ फेऱ्या बसेस पूर्ण करत असतात. त्याची टक्केवारी ९९ टक्के आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नियोजन कामामुळे एकेकाळी २५ हजारावर असणारी प्रवाशी संख्या आताही २१ जून रोजी मंगळवारी ७२ हजार ५२१ पर्यंत गेली आहे. त्यातच १०६१ पास धारक सुद्धा आहेत. बसची देखभाल दुरुस्ती व साफसफाई योग्य प्रकारे निगा राखल्यानेच व वेळेवर बस सुटत असल्याने तसेच शहराच्या कानाकोपऱ्यात परिवहनच्या बसेसचा फायदा पोहोचत असल्यानेही प्रवाशी संख्या वाढण्यात मदत होत आहे.

परिवहन ठेकेदार हा स्वतः गाड्यांचे मेंटेनन्स बघत असल्याने गाड्यांची दुरुस्ती व्हायलाही वेळ लागत नाही आहे. त्यासोबत पालिकेनि भविष्यात शहरांसाठी पर्यावरण पूरक अश्या इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचे नियोजन केल्याने त्या बस पालिका सेवेत लवकरात लवकर आल्यास सुद्धा प्रवाशी संख्या वाढण्यात पालिकेला यश येणार आहे.

पालिका परिवहन विभागामार्फत सामाजिक बांधीलकी जपत पालिका दररोज ७२ हजारच्या वर तिकीट विक्री करत त्यातून दररोज आठ ते नऊ लाख रुपयांची कमाई सुद्धा करत आहे. आता पालिकेकडे एकूण ७४ बसेस असून ६९ साध्या बसेस व असून पाच एसी असे आहेत.

लाडकी बहीण योजनेत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

सेव्हन हिल्स रुग्णालयावरून वातावरण तापले! अंधेरी येथील रुग्णालय खासगी उद्योगपतीला विकण्यास नागरिकांचा विरोध

सरकारी बँकांनी धोरण बदलावे; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टोचले कान

भारत-पाकिस्तान संघर्षात ८ विमाने पाडण्यात आली; आता ट्रम्प यांनी केला नवा दावा, युद्ध थांबविल्याचाही केला पुनरुच्चार

ॲक्वा लाईन मेट्रोमुळे बेस्टचे प्रवासी घटले! प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी अधिक गाड्या सोडण्याच्या विचारात प्रशासन