मुंबई

बेस्टचा दट्ट्या, कॉसिस कंपनी ताळ्यावर; वर्षअखेरपर्यंत ७०० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा

Swapnil S

मुंबई : वर्षे, दोन वर्षे उलटली तरी ७०० एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कॉसिस कंपनीला बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी दट्ट्या देताच कंपनी ताळ्यावर आली आहे. वर्षअखेरपर्यंत बसेसचा पुरवठा करण्याचे त्यांनी मान्य केले असून लवकरच प्रोटोटाईप (बसचा नमुना) बस तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यात वर्षअखेरपर्यंत सहा बसेस असणार आहेत.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्या भंगारात काढण्यात आल्या असून काही बसेसचे जतन करण्यात येणार आहे. परंतु मुंबईची शान असलेल्या डबलडेकर बसेसचा प्रवासाचा आनंद लुटता यावा, यासाठी एसी डबलडेकर बसेस घेण्यात येत आहेत. स्विच मोबॅलिटी आणि कॉसिस कंपनी या दोन्ही कंपन्या ९०० एसी डबलडेकर बसेस पुरवठा करणार असून स्विच मोबॅलिटी कंपनी २०० तर कॉसिस कंपनी ७०० बसेसचा पुरवठा करणार आहे. यापैकी स्विच मोबॅलिटी कंपनीने बसेसचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असून ४७ डबलडेकर बसेसचा पुरवठा केला असून उर्वरित बसेसचा पुरवठा टप्प्याटप्प्याने होणार आहे. मात्र कॉसिस कंपनी अद्याप एकही बस दिली नसून वारंवार स्मरणपत्र देऊन ही दुर्लक्ष केले जात होते. अखेर बेस्ट उपक्रमाने कडक शब्दात इशारा दिल्यानंतर काॅसिस कंपनीने वर्षे अखेरपर्यंत बसेसचा पुरवठा करण्यास होकार दिल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.

सध्याचा बेस्ट बसेसचा ताफा

बेस्टच्या मालकीच्या - १,१६४

भाडेतत्त्वावरील - १,७७७

एकूण - २,९४१

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस