मुंबई

दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक उद्यापासून बदलणार

कमल मिश्रा

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील सर्वात गर्दीचे स्थानक हे दादर आहे. दादरला पूर्व-पश्चिम रेल्वेच स्थानक आहे. त्यामुळे प्रवाशांची या स्थानकात कायम वर्दळ असते. या रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा गोंधळ निर्माण होत असतो. आता ९ डिसेंबरपासून दादर रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांचे क्रमांक प्रवाशांच्या सोयीसाठी बदलले जाणार आहेत.

दादर रेल्वे स्थानकात सध्या प. व मध्य रेल्वेचे असे एकूण १४ फलाट आहेत. मध्य रेल्वेवरील १ ते ७ क्रमांकांवरील फलाटांचे क्रमांक आता ८ ते १४ क्रमांकाचे बनतील. तर प. रेल्वेवरील सर्व स्थानकांचे क्रमांक कायम राहतील.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशांना प्रवास करताना स्पष्टता यावी म्हणून हे बदल केले आहेत. दादर हे मोठे जंक्शन आहे. तेथे प. रेल्वेच्या रोज १०५० गाड्या तर मध्य रेल्वेच्या ९०० गाड्या थांबतात. क्रमांक बदलाचे काम ८ डिसेंबरच्या मध्यरात्री पूर्ण केले जाईल. नवीन फलाट क्रमांक हे ९ डिसेंबरपासून सुरू होतील. प्रवाशांना समजण्यासाठी डिस्प्ले बोर्ड महत्वाच्या ठिकाणी लावले जातील. प. रेल्वेच्या भागात मध्य रेल्वेच्या फलाटांची बोर्डांची सूचना दिली जाईल.

असे असतील क्रमांक

प. रेल्वेचे १ ते ७ क्रमांकावरील फलाट क्रमांक ‘जैसे थे’

मध्य रेल्वेचा फलाट क्रमांक १ आता आठ

३ आता ९ क्रमांकाचा फलाट

४ आता १० क्रमांकाचा फलाट

५ आता ११ क्रमांकाचा फलाट

६ आता १२ क्रमांकाचा फलाट

७ आता १३ क्रमांकाचा फलाट

८ आता १४ वा क्रमांकाचा फलाट

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल

मुंबईतील धक्कादायक प्रकार! कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, खऱ्याखुऱ्या पोलिसाचाही कटात समावेश

Flying Taxi : आता उडत जायचं! भारतात सुरू होतेय फ्लाइंग टॅक्सी, आनंद महिंद्रांनी शेअर केले डिटेल्स

"बीडमध्ये इनकॅमेरा फेरमतदान घ्या..." बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र