मुंबई

बंडाळीची आता कायदेशीर लढाईच्या दिशेने वाटचाल सुरू

प्रतिनिधी

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीची आता कायदेशीर लढाईच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना बैठकीला हजर राहणे अत्यावश्यक असल्याचा व्हीप जारी केला होता. त्याला एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर देत विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली असून सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबाबत काढलेले आदेश कायदेशीरदृष्टया अवैध असल्याचे जाहीर केले आहे. शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या ३४ आमदारांच्या सहीचे पत्र देखील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याच्या राजकीय नाट्याचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. या बंडाने आता कायदेशीर लढाईचे स्वरूप घेतले आहे. कोणाचा विधिमंडळ पक्ष खरा, हे आता सिद्ध करावे लागणार आहे. बुधवारी सकाळी सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचा व्हीप काढला.

शिवसेना पक्षनेतृत्वावर शिंदेंचा गंभीर आरोप

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेल्या पत्रात पक्षनेतृत्वाबाबत गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. शिवसेना नेतृत्वाने निवडणूकपूर्व युतीऐवजी विरोधी विचारसरणी असणाऱ्या पक्षांसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. केवळ सत्तेसाठी नेतत्वाने हा निर्णय घेतला. यामुळे पक्षात मोठया प्रमाणात गोंधळ सुरू आहे. मराठी माणसासाठी लढण्याची शिवसेनेची भूमिकाही मागे पडली आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. तत्कालीन गृहमंत्री पोलीस खात्यांतील बदल्यांमधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरंगात आहेत. मंत्री नवाब मलिक हे देखील दाऊद इब्राहिमशी असलेल्या संबंधांच्या आरोपांवरून तुरूंगात आहेत. यावरून आम्हाला मोठया अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी या पत्रात नमूद केले आहे.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश

नवी मुंबई: 'रेप' केसला नाट्यमय वळण; आईसह बॉयफ्रेंडवर FIR; ६ वर्षांच्या मुलालाच 'तो' व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला