मुंबई

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच,नवी नीचांक पातळी गाठली

वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु आहे. गुरुवारच्या व्यवहारात रुपया ९ पैशांनी घसरुन ७९.९० या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाला. विदेशी गुंतवणूक संस्थांकडून भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेणे सुरुच असून विदेशी बाजारात अमेरिकन डॉलरची मजबूत स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवर रुपयाची घसरगुंडी सुरु आहे.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील क्रूड तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे रुपयाची घसरण आणखी थांबण्यास मदत झाली, असे फॉरेक्स डीलर्सने सांगितले.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज बाजारात स्थानिक चलन गुरुवारी सकाळी ७९.७२ या मजबूत स्थितीने उघडले आणि दिवसभरात ते ७९.७१ या कमाल आणि ७९.९२ या नीचांकी पातळीवर राहिले. दिवसअखेरीस ते ९ पैशांनी घसरुन ७९.९० या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाले.

तत्पूर्वी, भारतीय चलन रुपया बुधवारी डॉलरच्या तुलनेत ३ पैशांनी घसरुन ७९.६२ झाला. तसेच मंगळवारच्या व्यवहारात दिवसअखेरीस तो ७९.६० वर बंद झाला होता. सोमवारी भारतीय चलन रुपया १५ पैशांनी गडगडला नवा नीचांक ७९.६० वर बंद झाला होता.

राहुल गांधी रायबरेलीतून, अमेठीतून के. एल. शर्मा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

वेगमर्यादेमुळे हार्बरची कासवगती; लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

दुर्दैवी! बारवी नदीत तीन मित्रांचा बुडून मृत्यू; एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिघांनी गमावला जीव

गेल्या चार महिन्यांत मुंबईत किती घरांची झाली विक्री?