मुंबई

रुपया १० पैशांनी घसरुन नीचांकी ७७.७२ पातळीवर आला

प्रतिनिधी

रुपयाची सुरु असलेली घसरण गुरुवारी पुन्हा सुरुच राहिली आणि १० पैशांनी घसरुन नीचांकी ७७.७२ पातळीवर गेला. देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा या पार्श्वभूमीवर रुपयाने नवा तळ गाठला.

रुपया बुधवारी ७७.७२ वर उघडला आणि बुधवारच्या बंदच्या तुलनेत १० पैशांनी घसरला. व्यवहारसत्रात त्याने ७७.७६ ही किमान तर ७७.६३ ही कमाल पातळी गाठली. बुधवारच्या व्यवहारात रुपयाची १८ पैशांनी घसरगुंडी होऊन ७७.६२ वर बंद झाला होता.

मंगळवारीही दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरुन ७७.४७ वर बंद झाला होता. तत्पूर्वी, मंगळवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.४९ पर्यंत घसरला होता. सकाळी ७७.६७ वर उघडल्यानंतर दिवसभरात तो ७७.७९ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला होता. कच्च्या तेलाचे वाढते दर आणि घाऊक महागाईचा चढता पारा यामुळे सकाळी रुपया घसरल्यानंतर तो सावरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ९ मे २०२२ रोजी भारतीय चलनात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती.ची सुरु असलेली घसरण गुरुवारी पुन्हा सुरुच राहिली आणि १० पैशांनी घसरुन नीचांकी ७७.७२ पातळीवर गेला. देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा या पार्श्वभूमीवर रुपयाने नवा तळ गाठला.

रुपया बुधवारी ७७.७२ वर उघडला आणि बुधवारच्या बंदच्या तुलनेत १० पैशांनी घसरला. व्यवहारसत्रात त्याने ७७.७६ ही किमान तर ७७.६३ ही कमाल पातळी गाठली. बुधवारच्या व्यवहारात रुपयाची १८ पैशांनी घसरगुंडी होऊन ७७.६२ वर बंद झाला होता.

मंगळवारीही दिवसभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरुन ७७.४७ वर बंद झाला होता. तत्पूर्वी, मंगळवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.४९ पर्यंत घसरला होता. सकाळी ७७.६७ वर उघडल्यानंतर दिवसभरात तो ७७.७९ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला होता. कच्च्या तेलाचे वाढते दर आणि घाऊक महागाईचा चढता पारा यामुळे सकाळी रुपया घसरल्यानंतर तो सावरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ९ मे २०२२ रोजी भारतीय चलनात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती.

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर

IPLची रणधुमाळी सुरू! बंगळुरू-हैदराबाद लढतीने आजपासून १९व्या पर्वाला शानदार प्रारंभ

नवी मुंबईतून आता थेट श्रीनगर, गोवा, तिरुपती; उद्यापासून विमानसेवांचा विस्तार, तब्बल ४६ शहरांसाठी थेट सेवा

केंद्र सरकार ८.२० लाख कोटी कर्ज घेणार; महसुली तूट भरून काढण्यासाठी निर्णय