मुंबई

सेन्सेक्स ७५ हजारांना स्पर्श करून माघारी

Swapnil S

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी दोन्ही निर्देशांक नवीन शिखरे गाठून माघारी फिरले. सेन्सेक्सने दिवसभरातील व्यवहारात प्रथमच ऐतिहासिक ७५ हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र, सत्र संपण्यापूर्वी नफा-वसुलीमुळे निर्देशांकात किरकोळ घसरण झाली. दरम्यान, विदेशी चलन बाजार गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी बंद होता.

आपल्या विक्रमी तेजीला रोखत बीएसई सेन्सेक्स ५८.८० अंकांनी किंवा ०.०८ टक्क्यानी घसरून ७४,६८३.७० वर बंद झाला. दिवसभरात, तो ३८१.७८ अंक किंवा ०.५१ टक्क्यानी वाढून ७५,१२४.२८ या सर्वकालीन शिखरावर पोहोचल्यानंतर अखेरीस माघारी फिरला. अशाच प्रकारे एनएसई निफ्टी २३.५५ अंकांनी किंवा ०.१० टक्क्यानी घसरून २२,६४२.७५ वर बंद झाला. दिवसभरात, तो १०२.१ अंक किंवा ०.४५ टक्क्यानी वाढून २२,७६८.४० या विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर माघारी फिरला.

सेन्सेक्सवर्गवारीत टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो आणि आयटीसी या प्रमुख कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. तर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, नेस्ले आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या समभागात वाढ झाली.

बीएसई मिडकॅप ०.४७ टक्क्यानी घसरला आणि स्मॉलकॅप ०.१५ टक्क्यांनी घसरला. निर्देशांकांमध्ये ग्राहक टिकाऊ वस्तू १.१० टक्क्यांनी, औद्योगिक ०.५५ टक्क्यांनी, भांडवली वस्तू ०.४८ टक्का आणि दूरसंचार ०.२९ टक्का घसरले. तर धातू ०.५३ टक्का, रिॲल्टी ०.५० टक्का, वित्तीय सेवा ०.२२ टक्का आणि टेक ०.१० टक्का वाढले.

आशियाई बाजारांमध्ये टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग सकारात्मक क्षेत्रात बंद झाले तर सेऊल नकारात्मक बंद झाले. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत घसरण झाली होती. वॉल स्ट्रीट सोमवारी संमिश्र व्यवहारांवर बंद झाले.

उद्याच्या महत्त्वाच्या अमेरिकन किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या अपेक्षेने उच्च पातळीवर नफा-वसुली पाहण्यापूर्वी भारतीय बाजारपेठेने दिवसभरातील नवीन शिखर गाठले आहे. यूएस फेडद्वारे भविष्यातील व्याजदर कपातीकडे लक्ष लागलेले आहे. अपेक्षित यूएस रोजगार आणि उत्पादन डेटा, या वर्षी व्याजदर कपातीबाबत अपेक्षेमध्ये संभाव्य बदल सुचवितो, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारी ६८४.६८ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, असे एक्स्चेंजची आकडेवारी सांगते. तर जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.१८ टक्क्यानी वाढून ९०.५४ अमेरिकन डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तसेच बीएसई सेन्सेक्स सोमवारी ४९४.२८ अंकांनी किंवा ०.६७ टक्क्यानी वाढून ७४,७४२.५० या नवीन शिखरावर बंद झाला तर एनएसई निफ्टी १५२.६० अंकांनी किंवा ०.६८ टक्क्यानी वाढून २२,६६६.३० वर पोहोचला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस