मुंबई

दाभोळकर हत्याकांडप्रकरणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Swapnil S

नवी दिल्ली : अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची आता गरज नाही, या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्या. विक्रम नाथ व सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दाभोळकर यांची मुलगी मुक्ता दाभोळकर हिने केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाभोळकरांच्या मुलीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. प्रथमदर्शनी हायकोर्टाने दिलेल्या आदेशात आम्ही हस्तक्षेप करत नाही, अशी टिप्पणी खंडपीठाने याचिका फेटाळताना केली आहे. मुक्ता दाभोळकर यांच्या वतीने ॲड. आनंद ग्रोव्हर यांनी काम पाहिले. दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. २०१४ पासून मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली हा खटला सुरू होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या, झाडून घेतल्या स्वतःवर गोळ्या

ना घर, ना जमीन...पंतप्रधान मोदींकडे किती आहे संपत्ती?

मुंबई होर्डिंग घटनेतील आरोपीचं २३ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नाव, बलात्काराच्या आरोपाखाली झाली होती अटक