मुंबई

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला;१२०० पार नवीन रुग्णांची नोंद

दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६७० वर पोहोचली आहे.

प्रतिनिधी

मे महिन्यात चौथ्या लाटेचा शिरकाव झाला. मात्र योग्य उपचार पद्धतीमुळे चौथी लाट मुंबईतून हद्दपार झाली असे संकेत मिळत असताना पुन्हा एकदा चौथ्या लाटेचा फैलाव होऊ लागला आहे. जून जुलै महिन्यात रोज आढळणारी रुग्ण संख्या ३०० ते ५०० च्या घरात होती. मात्र पुन्हा एकदा रुग्ण संख्येत वाढ होत असून गेल्या चार दिवसांपासून रुग्ण संख्येत दुपटीने वाढ होत आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल १,२०१ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्या ११ लाख ३५ हजार ६८० वर पोहोचली आहे. तर दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६७० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे.

दरम्यान, दिवसभरात ६८१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख १० हजार २९८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ५ हजार ७१२ रुग्ण सक्रिय आहेत.

मुंबईचा कोरोना डॅशबोर्ड

: सध्याचे सक्रिय रुग्ण - ५०४१

: रुग्ण दुपटीचा कालावधी - १२१३ दिवस

: रुग्ण वाढीचे प्रमाण - ०.०५७ टक्के

: रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९७.८ टक्के

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव