मुंबई

पाणटिवळ्या पक्ष्याने पाच दिवसांत पार केले १० हजार किमीचे अंतर

सुमारे १० हजार किमीचे अंतर पाच दिवसांत पूर्ण केल्याचे या टॅगिंगवरून स्पष्ट झाल्याचे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात आले

प्रतिनिधी

पावसाच्या सरी कमी झाल्या की मुंबईसह ठाणे, उरण, इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येऊ लागतात. भांडुप येथील उदंचन केंद्र परिसरात अलीकडेच रशिया सायबेरियातील काळ्या शेपटीचा पाणटिवळा पक्ष्याचे दर्शन पक्षीप्रेमींना झाले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेने काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्या या स्थलांतरित पक्ष्याला मार्च २०२२ रोजी जीपीएस टॅगिंग केले होते. साधारण १८ सप्टेंबर रोजी सायबेरिया सोडून मुंबईकडे वाटचाल केलेल्या या पक्ष्याने अवघ्या ५ दिवसात म्हणजे २३-२४ सप्टेंबर दरम्यान मुंबई गाठली आहे. सायबेरिया ते मुंबईतील भांडुप उदंचन केंद्रापर्यंतचे सुमारे १० हजार किमीचे अंतर पाच दिवसांत पूर्ण केल्याचे या टॅगिंगवरून स्पष्ट झाल्याचे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात आले.

परतीच्या पावसानंतर मुंबईत स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा पावसाळा संपण्यास काही कालावधी असताना रशियामधील सायबेरियाहून काळ्या शेपटीचा पाणटिवळा मुंबईत दाखल झाला आहे. या पक्ष्याचे नाव पक्षी अभ्यासकांनी ‘बाला’ असे ठेवले आहे. या पक्ष्याने सायबेरिया ते मुंबईतील भांडुप उदंचन केंद्रापर्यंतचे सुमारे दहा हजार किमीचे अंतर पाच दिवसांत पूर्ण केले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या पर्यावरणप्रेमी संस्थेने काळ्या शेपटीच्या पाणटिवळ्या या स्थलांतरित पक्ष्याला मार्च २०२२ रोजी जीपीएस टॅगिंग केले होते. एप्रिल २०२२ रोजी या पक्षाने ठाणे खाडी परिसर सोडला.

त्यानंतर सायबेरिया गाठायला जून महिना उजाडला. जून ते सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सायबेरियात वास्तव्य केले. साधारण १८ सप्टेंबर रोजी सायबेरिया सोडून मुंबईकडे वाटचाल केलेल्या या पक्ष्याने अवघ्या ५ दिवसांत म्हणजे २३-२४ सप्टेंबर दरम्यान मुंबई गाठल्याचे पक्षी अभ्यासकांनी केलेल्या टॅगिंग वरून स्पष्ट झाले आहे. यावेळी त्याने काही ठिकाणी थांबा घेतल्याचा अंदाज आहे. तसेच, त्याने समुद्रावरून प्रवास करण्याऐवजी जमिनीवरून प्रवास केला असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

'पुढच्या वर्षी लवकर या'...; गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर अन् फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या बाप्पाला निरोप

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

नवी मुंबई APMC चा पुनर्विकास करणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

दार्जिलिंग टॉय ट्रेनचा जागतिक पर्यटनात डंका; ‘लोनली प्लॅनेट’ची २०२७ साठी सर्वोत्तम ठिकाणांची यादी जाहीर

नेतन्याहूंच्या भाषणावर ७५ देशांचा बहिष्कार