मुंबई

मंत्रिमंडळ विस्‍ताराचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्‍यता

राज्‍यात सध्या फक्‍त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच मंत्रिमंडळ आहे.

प्रतिनिधी

तब्‍बल २४ दिवसांनंतरही अद्याप राज्‍यातील मंत्रिमंडळ विस्‍तार होऊ शकलेला नाही. त्‍यावरून आता विरोधी पक्षांकडूनही सरकारवर टीकास्‍त्र सोडले जात आहे; मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी एकटेच दिल्‍ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्‍यान त्‍यांची पक्षश्रेष्‍ठींशी चर्चा झाल्‍याचे समजते. त्‍यामुळे आता मंत्रिमंडळ विस्‍ताराचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे.

राज्‍यात सध्या फक्‍त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच मंत्रिमंडळ आहे. २४ दिवस उलटले तरी अद्याप विस्‍तार झालेला नाही. विरोधी पक्षाकडून तर टीकास्‍त्र सोडले जात आहेच; पण भाजप तसेच शिंदे गटामधील आमदारांमध्येदेखील उत्‍सुकता आहे. मंत्रिमंडळ विस्‍तारामागे न्यायालयीन खटल्‍याची कोणतीही अडचण नसल्‍याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्‍पष्‍ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्‍तार दोन टप्प्यात होणार असल्‍याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्‍ली दौऱ्याला महत्त्व आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपशासित राज्‍यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद बोलावली होती. बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्‍थित होते. पक्षाच्या सुशासन धोरणावर या बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या बैठकीत उपस्‍थितांना विकास कामांबाबत मार्गदर्शन केले.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर; ६७ गावांचा संपर्क तुटला, ८ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

धाराशिव : नातू अन् आजी अडकले पुरात; खासदार ओमराजे निंबाळकर उतरले थेट पाण्यात, व्हिडिओ व्हायरल

राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर होण्याची शक्यता; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

Yavatmal : धक्कादायक! शिक्षकच बनला भक्षक; विद्यार्थिनीवर ९ महीने बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्यांनी घेतला जीव