मुंबई

महाराष्ट्रात बूस्टर डोस घेणाऱ्यांमध्ये झाली वाढ

दुसरीकडे लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाणही १२ टक्क्यांनी वाढले आहे

प्रतिनिधी

राज्यात ओमायक्रॉनच्या ‘बीए ४’ आणि ‘बीए ५’ या नवीन व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. शिवाय, संसर्ग वेगाने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते ५९ वयोगटातील नागरिक जास्तीत जास्त बूस्टर डोस घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात १५ दिवसांत बूस्टर डोसमध्ये ७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे बूस्टर डोस घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये याच कालावधीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नागरिकांमध्ये संसर्ग होण्याची भीती वाढत असल्याचे सांगत दुसरीकडे लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाणही १२ टक्क्यांनी वाढले आहे. ५ जून रोजी १८ ते ५९ वयोगटातील ३,१२,१९२ लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला होता. जो आता १५ दिवसांत म्हणजेच २० जूनपर्यंत ५,५०,००६ पर्यंत वाढला आहे. याचा अर्थ २,३७,८१४ जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बूस्टर डोस घेणाऱ्या लाभार्थींची संख्या याच कालावधीत १६.८५ लाखांवरून १९.३६ लाख झाली आहे. महाराष्ट्रात रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जूनमध्ये सुरू झालेल्या ‘हर घर दस्तक २.०’ मोहिमेअंतर्गत बूस्टरची मागणी वाढली आहे. त्यातून १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांमधील लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे

मुलांच्या लसीकरणाची माहिती

कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, पालिका शाळांमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील सुमारे ७६ हजार मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी किती मुलांनी सुटीच्या काळात लसीकरण केले, याची माहिती गोळा केली जात आहे. लसीकरणास इच्छुक नसलेल्या मुलांच्या पालकांचे समुपदेशन केले जाईल.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन