मुंबई प्रेस क्लबला धमकीचा मेल; पोलीस, श्वान पथकाकडून सखोल तपासणी 
मुंबई

मुंबई प्रेस क्लबला धमकीचा मेल; पोलीस, श्वान पथकाकडून सखोल तपासणी

मुंबईतील पत्रकारांची संघटना असलेल्या आझाद मैदान येथील मुंबई प्रेस क्लबला त्यांच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा मेल आला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या सायबर सेल, बॉम्ब शोध आणि नाशकपथक तसेच डॉग स्क्वॉडच्या पथकांनी प्रेस क्लबच्या परिसरात पोहोचून सखोल तपासणी केली.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पत्रकारांची संघटना असलेल्या आझाद मैदान येथील मुंबई प्रेस क्लबला त्यांच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा मेल आला. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या सायबर सेल, बॉम्ब शोध आणि नाशकपथक तसेच डॉग स्क्वॉडच्या पथकांनी प्रेस क्लबच्या परिसरात पोहोचून सखोल तपासणी केली. या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मुंबई प्रेस क्लबला १९ मार्चला त्यांच्या अधिकृत ईमेलवर धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. हा ई-मेल २० मार्चच्या सकाळी निदर्शनाला आला. त्यानंतर सचिव मयूरेश गणपत्ये यांनी तातडीने ही बाब आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या निदर्शनाला आणत तक्रार दाखल केली तसेच डीसीपी झोन एकचे प्रमुख प्रवीण मुंडे यांनाही याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, सायबर पथकाकडून मेलमधील मजकूर आणि पाठवणाऱ्या ई-मेल आयडीची माहिती गोळा करण्यात आली आहे.

धमक्यांना घाबरणार नाही

मुंबई प्रेस क्लब या दूषित आणि चिंताजनक धमकीचा तीव्र निषेध करतो. क्लबने नेहमीच उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्यांचे समर्थन व प्रसार केला आहे.

सर्व प्रकारच्या अतिरेक व हिंसाचाराविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. तीन हजारांहून अधिक पत्रकार सदस्य असलेला मुंबई प्रेस क्लब अशा धमक्यांना घाबरणार नाही आणि आपल्या तत्त्वांशी बांधील राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल