मुंबई

वाघाच्या कातडीसह नखांची विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

सुरज लक्ष्मण कारंडे, मंजूर मुस्तफा मानकर आणि मोहसीन नजीर जुंद्रे अशी या तिघांची नावे असून, ते तिघेही सातारा येथील महाबळेश्‍वरचे रहिवाशी आहेत.

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाची कातडीसह नखांची विक्रीसाठी आलेल्या तिघांना एमएचबी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सुरज लक्ष्मण कारंडे, मंजूर मुस्तफा मानकर आणि मोहसीन नजीर जुंद्रे अशी या तिघांची नावे असून, ते तिघेही सातारा येथील महाबळेश्‍वरचे रहिवाशी आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी काळे-पिवळ्या रंगाचे पट्टे असलेले वाघाचे कातडे आणि बारा वाघ नखांचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत १० लाख ६० हजार रुपये इतकी आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. महाबळेश्‍वर येथून काहीजण वन्य प्राण्याच्या अवयवाची विक्रीसाठी मुंबईतील बोरिवली परिसरात येणार असल्याची माहिती एमएचबी पोलिसांना मिळाली होती.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार : प्रसिद्ध रॉकस्टार जेम्सच्या कॉन्सर्टवर हल्ला; तस्लीमा नसरीन यांची संतप्त प्रतिक्रिया, "जिहादींनी जेम्सला...

Mumbai : ChatGPT वापरून बनवला लोकल ट्रेनचा बनावट पास; भन्नाट आयडिया तरुणाच्या अंगलट

Navi Mumbai : मातृत्वाला काळीमा! कळंबोलीत चिमुकलीचा गळा दाबून खून

मुरबाडमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; मुख्याध्यापक निलंबित

ठाणे महापालिका निवडणुकीत शाईऐवजी मार्कर