Tiger Shroff Firing Case: सर्व आरोपींना मकोका लागू (Photo-X)
मुंबई

Tiger Shroff Firing Case: सर्व आरोपींना मकोका लागू

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) या प्रकरणात सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतर सर्व आरोपींवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' (मकोका) लागू केला आहे.

Swapnil S

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राइम ब्रँच) या प्रकरणात सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी मिळाल्यानंतर सर्व आरोपींवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' (मकोका) लागू केला आहे.

या प्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी जुहू पोलीस ठाण्यात मूळ एफआयआर दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) तसेच आर्म्स कायद्याच्या संबंधित कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

११ जणांना अटक

गुन्हे शाखेने या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण ११ जणांना अटक केली असून कसून चौकशी सुरू आहे. १८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जुहू परिसरात तीन हल्लेखोरांनी मोटारसायकलवरून येऊन अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केला होता. या हल्ल्यातून अभिनेता टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, तर या गोळीबारात त्याचा चालक आणि एक पादचारी जखमी झाले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात २३ जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित; ३५ हजार मेगावाॅट क्षमतेचे प्रकल्प

कोण आहे हा लॉरेन्स बिष्णोई?

आजचे राशिभविष्य, २८ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Fashion Tips : जुन्या कपड्यांमध्येही दिसाल स्टायलिश; फॉलो करा 'या' भन्नाट टिप्स

दिवाळीपूर्वी दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये, पुण्यात भारत मंडपम... मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ मोठे निर्णय