प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

‘टिस’च्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

चेंबूर येथे अनुराग जयस्वाल नावाच्या एका टिसच्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.

Swapnil S

मुंबई : चेंबूर येथे अनुराग जयस्वाल नावाच्या एका टिसच्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. अनुरागने शनिवारी एका पार्टीत मद्यप्राशन केले होते. त्यातून त्याचा मृत्यू झाला आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याच्या रिपोर्टनंतर मृत्यूच्या अधिकृत कारणाचा खुलासा होणार आहे.

याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेला अनुराग हा चेंबूर येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्याच्या तीन मित्रांसोबत राहत होता. तो सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स इन एचआरच्या पहिल्या वर्षात शिकत होता.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक