एफपीजे/विजय गोहिल
मुंबई

Torres Scam : बल्गेरियामध्येही परदेशी आरोपींच्या गुंतवणूक योजना; आर्थिक गुन्हे शाखेकडून पडताळणी सुरू

टोरेस गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासात असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील आरोपींनी बल्गेरियामध्येही अशाच प्रकारच्या गुंतवणूक योजना सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Swapnil S

मुंबई : टोरेस गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासात असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील आरोपींनी बल्गेरियामध्येही अशाच प्रकारच्या गुंतवणूक योजना सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पडताळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून नऊ आरोपी फरार आहेत. त्यापैकी आठ जण युक्रेनचे तर एक जण तुर्किएचा आहे. १२,७८३ गुंतवणूकदारांची १३० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे या घोटाळ्याच्या चौकशीत समोर आले आहे.

आरोपींनी बल्गेरियामध्ये वेगळ्या कंपनीच्या नावाखाली नवीन गुंतवणूक योजना सुरू केल्याच्या माहितीस दुजोरा देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सध्या तपास करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. या माहितीबाबत तथ्य आढळल्यानंतर संबंधित माहिती बल्गेरियातील कायदा अंमलबजावणी यंत्रणांना पाठवली जाईल, असेही सांगितले.

टोरेस गुंतवणूक घोटाळ्याच्या अनुषंगाने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांचे मालमत्ता व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तपास यंत्रणेकडून कंपनीकडील गाड्या, फर्निचर, वीज उपकरणे यांचा लिलाव करण्यासाठी न्यायालयाची परवानगीही मागण्यात आली आहे. माहितीतील तथ्य स्पष्ट झाल्यानंतर व कारवाई योग्य पद्धतीने सुरू झाल्यानंतर ४० कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत मिळू शकतात, अशी शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: १९ नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती; बारामती, अंबरनाथमध्ये पुन्हा गोंधळ

मुंबईच्या नावासाठी उद्धव ठाकरे कडाडले, 'जिथे-जिथे बॉम्बे लिहलंय तिथे...

BLO च्या मानधनात वाढ, पण राज्य सरकारकडून विलंब; निवडणूक आयोगाची तक्रार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; बूथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ

Mumbai : पोलीस कॉन्स्टेबलच्या गर्भवती पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल