संग्रहित छायाचित्र PC : (X) @AkshayAkkiFan
मुंबई

टोरेस घोटाळ्याप्रकरणी सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन; कार्यालयासह आरोपींच्या घरातून अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त

दोन ते तीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकाला गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले, तर दोन पथक तपासकामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या गुन्ह्यात दोन मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Swapnil S

मुंबई : टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून गुरुवारी पोलिसानी सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. यावेळी टोरेस कंपनीच्या चार शाखेसह दोन महिला आरोपींच्या घरात छापा टाकून पोलिसांनी अडीच ते तीन कोटींची रोकड जप्त केली आहे.

याकरिता दोन ते तीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून एका पथकाला गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्याचे काम सोपविण्यात आले, तर दोन पथक तपासकामी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. या गुन्ह्यात दोन मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

टोरेस कंपनीतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येताच तीन दिवसांपूर्वी शिवाजी पार्क पोलिसांनी कंपनीच्या संचालकासह इतर पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत संचालक सर्वेश अशोक सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली. ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे.

चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलाबा, ऑपेरा हाऊस, डोंबिवली, एन. एम. जोशी मार्ग, गिरगाव आणि दादर येथील चार कार्यालयासह तानिया आणि व्हेलेटिना यांच्याकरिता सर्च ऑपरेशन हाती घेतले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत