मुंबई

मुंबईतील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या, आदेश जारी

तेजस्विनी सातपुते यांची पुण्यात तर राजतिलक रोशन यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : शहरातील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तेजस्विनी सातपुते यांची पुण्यात तर राजतिलक रोशन यांच्याकडे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई शहरातील पाच पोलीस उपायुक्तांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.

सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांची परिमंडळ पाच, परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त दिक्षीत कुमार गेडाम यांची परिमंडळ नऊ, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांची परिमंडळ आठमध्ये बदली करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार यांची घाटकोपर विभागात, संरक्षण व सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांची वडाळा पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महेश बळवंतराव यांची एमएचबी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम