MUMBAI : तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांत २४ व्यांदा बदली 
मुंबई

MUMBAI : तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांत २४ व्यांदा बदली

धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे फक्त वर्षानुवर्षे होणाऱ्या बदल्यांवरून आणि आपल्या काम करण्याच्या शैलीवरून कायम चर्चेत असतात.

Swapnil S

मुंबई : धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे फक्त वर्षानुवर्षे होणाऱ्या बदल्यांवरून आणि आपल्या काम करण्याच्या शैलीवरून कायम चर्चेत असतात. कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. २१ वर्षाच्या प्रशासकीय कारकीर्दीत मुंढे यांची तब्बल २४ वेळा बदली झाली आहे.

ऑगस्ट २०२५ पासून दिव्यांग कल्याण कल्याण विभागाच्या सचिवपदी कार्यरत असलेल्या मुंढे यांची आठ महिन्यांतच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.

तुकाराम मुंढे हे २००५ मधील आयएएस अधिकारी आहेत. सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. धाडसी अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व सचिवपदी त्यांनी काम केले आहे. सप्टेंबर २००७ मध्ये देगलूर उपविभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. जानेवारी २००८ मध्ये त्यांच्याकडे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबादरी सोपाविली. मार्च २००९ मध्ये आदिवासी विभागाचे आयुक्त, जुलै २००९ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. जून २०१० मध्ये कल्याण येथे मुख्य कार्यकारी अधिकारी तर जून २०११ मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी झाले. सप्टेंबर २०१२ मध्ये विक्रीकर सहआयुक्त मुंबई तर नोव्हेंबर २०१४ मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी बनले. मे २०१६ मध्ये नवी मुबई महापालिका आयुक्त, मार्च २०१७ मध्ये पीएमपीएल पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, फेब्रुवारी २०१८ मध्ये नाशिक महापालिका आयुक्त, नोव्हेंबर २०१८ मध्ये नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून त्यांची बदली झाली होती. डिसेंबर २०१८ मध्ये एडस नियंत्रण मुंबई प्रकल्प अधिकारी झाले.

जानेवारी २०२० मध्ये नागपूर महापालिका आयुक्त, ऑगस्ट २०२० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई येथे सदस्य सचिव झाले. जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगची जबाबदारी सोपविली. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांची आरोग्य सेवा व संचालक विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. एप्रिल २०२३ मध्ये पशुसंवर्धन विभागाचे सचिव, जून २०२३ मध्ये मराठी भाष विभागाचे सचिव, जुलै २०२३ मध्ये कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सचिवपदी बदली झाली.

दिव्यांग विभागात कारवाईचा धडाका

मुंढे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी माणिक गुरसळ यांची नियुक्ती झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागात काम करताना मुंढे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. या कालावधीत त्यांचे प्रशासकीय कामकाजावरून अनेकदा लोकप्रतिनिधींशी खटके उडाले आहेत.

'या'ठिकाणी झाल्या बदल्या

  • ऑगस्ट २००५ : प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.

  • सप्टेंबर २००७ : उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.

  • जानेवारी २००८ : सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.

  • मार्च २००९ : आयुक्त, आदिवासी विभाग.

  • जुलै २००९ : सीईओ, वाशिम.

  • जून २०१० : सीईओ, कल्याण.

  • जून २०११ : जिल्हाधिकारी, जालना.

  • सप्टेंबर २०१२ : विक्रीकर सहआयुक्त मुंबई.

  • नोव्हेंबर २०१४ : सोलापूर जिल्हाधिकारी.

  • मे २०१६ : आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

  • मार्च २०१७ : मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.

  • फेब्रुवारी २०१८ : आयुक्त, नाशिक महापालिका.

  • नोव्हेंबर २०१८ : सहसचिव, नियोजन.

  • डिसेंबर २०१८ : प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.

  • जानेवारी २०२० : आयुक्त, नागपूर महापालिका.

  • ऑगस्ट २०२० : सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.

  • जानेवारी २०२१ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.

  • सप्टेंबर २०२२ : आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.

  • एप्रिल २०२३ : सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

  • जून २०२३ : सचिव मराठी भाषा विभाग

  • जुलै २०२३ : कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव

  • जून २०२४ : असंघटित कामगार विभाग

  • ऑगस्ट २०२५ : दिव्यांग कल्याण विभाग

  • मार्च २०२६ : आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल