अर्नाळा समुद्रात दोन मुले गेली वाहून 
मुंबई

Palghar : अर्नाळा समुद्रात दोन मुले गेली वाहून

पालघर जिल्ह्यातील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी एका मोठ्या भरतीच्या लाटेत दोन अल्पवयीन मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Swapnil S

पालघर : पालघर जिल्ह्यातील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी सकाळी एका मोठ्या भरतीच्या लाटेत दोन अल्पवयीन मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अयान आणि सोयाब (दोघांचे वय १७ वर्षे) अशी या बेपत्ता झालेल्या मुलांची नावे असून, त्यांचा शोध घेण्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली जात आहे.

गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास काही मुले समुद्रात पोहायला गेली असता हा प्रकार घडला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी (लाइफगार्ड्स) तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र इतर दोन मुले पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेली.

समुद्रातील तुफानी लाटांमुळे आमच्या बचाव नौकेलाही पाण्यात टिकून राहणे कठीण होत होते, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या समुद्रात एवढी प्रचंड भरती आहे की, प्रशिक्षित पोहणारेही पाण्यात उतरण्याचे धाडस करू शकत नाहीत, असेही तो म्हणाला.

अर्नाळा गावचे सरपंच नंदकुमार घरत यांनी सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. तरीही या मुलांनी जीवरक्षकांची नजर चुकवून समुद्रात प्रवेश केला आणि ते लाटांच्या प्रवाहासोबत वाहून गेले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू