मुंबई

परीक्षा उद्या, पण विद्यार्थ्यांना अजून हॉल तिकीटच नाही; आदित्य ठाकरे म्हणाले, "विद्यार्थ्यांचे भविष्य..."

प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. उद्या म्हणजे १२ एप्रिलपासून बीए विभागाच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा सुरु होणार आहेत. पण परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाचे वाटप झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉल तिकीट न मिळाल्याने परीक्षेचे ठिकाण आणि आसन क्रमांक माहित नसताना परीक्षा द्यायची कुठे आणि कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, "मुंबई विद्यापीठाच्या बीए विभागाची तिसऱ्या वर्षाची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. पण विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीट मिळालेले नसून त्यांचे पाचव्या सेमिस्टरचे निकालही अद्याप मिळालेले नाहीत. असे असतानाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रविरोधी सरकारचा एक भाग बनून राज्याचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहेत. त्यांचे मंत्रालयातील काम लाजिरवाणे असून हा प्रश्न युवासेनेने विद्यापीठाकडे उचलून धरला आहे," असे ट्विट करत आदित्य ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?