ठाकरे गट करणार रामरक्षा आंदोलन; खासदार फोडण्यासाठी राममंदिराचा पैसा - उद्धव ठाकरेंचा आरोप 
मुंबई

ठाकरे गट करणार रामरक्षा आंदोलन; खासदार फोडण्यासाठी राममंदिराचा पैसा - उद्धव ठाकरेंचा आरोप

हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणाऱ्यांचा पैसा इतर राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला जात आहे, असा घणाघाती आरोप करत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

Swapnil S

मुंबई : हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणाऱ्यांचा पैसा इतर राजकीय पक्ष आणि आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला जात आहे, असा घणाघाती आरोप करत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले. येत्या रविवारी, ५ जुलै रोजी दादरच्या मारुती मंदिर येथे रामरक्षा आंदोलन आणि महाआरती करणार असल्याची घोषणा केली.

श्रीराम मंदिराच्या  दानपेटीतील निधीच्या अपहाराचे प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव  ठाकरे यांनी आज  'मातोश्री'  निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि अप्रत्यक्षपणे  भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय जाहीर केला.  

ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी सहन होत नाही आणि जाब विचारावा वाटतोय त्या सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करून ते म्हणाले की, या आंदोलनासाठी मी स्वतः तिकडे जाणार असून माझ्यासोबत शिवसेनेचे नेते, लोकप्रतिनिधी असतील. ज्यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाही ते सुद्धा या आंदोलनात येवू शकतात.

अब हिंदू माफ नही करेगा

अब हिंदू माफ नहीं करेगा, अशी घोषणा करून ठाकरे म्हणाले की, हे केवळ शिवसेनेचे आंदोलन नाही. त्यामुळे  सर्व रामभक्त, हिंदुत्ववादी नागरिक, वारकरी आणि हिंदू समाजाने पक्षभेद बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे. रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करून आंदोलनाला सुरुवात होईल, असे सांगतानाच  ठाकरे यांनी दादरनंतर  राज्यातील प्रत्येक जिल्हा, शहर आणि गावातील राम तसेच  हनुमान मंदिरांमध्ये अशाच स्वरूपाचे 'रामरक्षा आंदोलन' राबविले जाईल, असे घोषित केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : विनापरवानगी चरासाठी शुल्क; चर खोदणे व पुनर्भरण सर्वसमावेशक धोरण-२०२६, युटीलिटी कामांसाठी डायमंड कटर बंधनकारक

Mumai : वांद्रे येथे सहाव्या मार्गिकेसाठी नवीन फलाट; सुमारे १०० कुटुंबांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात

'कोबी'ला दोन रुपये किलो भाव; तीन एकर कोबीवर आधी मेंढ्या सोडल्या, नंतर रोटावेटर फिरवून उभे पीक केले नष्ट

Navi Mumbai : द्रोणागिरीत पाण्यासाठी टाहो! ३५० कुटुंबे पाण्याविना; टँकरवर दरमहा पाच लाखांचा खर्च