मुंबई

"अध्यक्ष फक्त विधानसभेतच, त्यांचे तात्काळ निलंबन करा..." ; राहुल नार्वेकर प्रकरणावर उद्धव ठाकरे आक्रमक

उमेदवारी अर्ज दाखल करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावल्याचा प्रकार धक्कादायक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले.

किशोरी घायवट-उबाळे

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि.४) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे महत्त्वाची मागणी केली आहे. सध्या चर्चेत असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. “विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निलंबन केले पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली.

उमेदवारी अर्ज दाखल करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावल्याचा आरोप असलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा प्रकार धक्कादायक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवसेना भवनात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “देशातील वातावरण असे झाले आहे की आधी मतदान चोरण्यात आले, आता उमेदवारच चोरण्यात येत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर खुलेआम उमेदवार आणि मतदारांना धमकावत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे," असे ठाकरे म्हणाले. बिनविरोध निवडणुकीद्वारे मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र काँग्रेसने आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा यासोबतच, ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्या प्रभागांतील निवडणूक निकाल रद्द करून तेथे पुन्हा मतदान प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “त्या ठिकाणी माझ्यावरच दबाव टाकण्यात आला. एक माजी आमदार (एमएलसी) आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे,” असे स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिले.

या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांभोवती राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गणपती सजावटीला 'चिनी' मालाचा झगमगाट; बाजारात स्वस्त साहित्याला पसंती, धारावी, भिवंडीच्या प्लास्टिक फुलांनाही मागणी

भरती परीक्षेतील सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी

Mumbai : 'लक्ष्मी निवास 'च्या जागी २१ मजली टॉवर होणार

वीजनिर्मिती केंद्रांमध्ये ९ दिवसांचाच कोळसा?

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी पाणी घेणेही थांबवले